साहित्य क्षेत्रातील डॉ.सरोजिनी बाबर उर्फ सर्वांच्या लाडक्या आक्का यांचे कार्य
आक्कांचे वडील गुरुवर्य श्री कृष्णराव भाऊराव बाबर (अण्णा) यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली.त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रातील अण्णांच्या विद्यार्थ्यांनी इस्लामपूर येथे म.म.द.वा.पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार केला आणि एक थैली त्यांना अर्पण केली. त्या निधीमध्ये स्वतःची भर घालून अण्णांनी एक प्रकाशन चालू केले आणि अशा प्रकारे, २० ऑक्टोबर १९५० ला, दसऱ्याच्या दिवशी "समाज शिक्षण माला" स्थापन केली. याच दिवशी "दसरा दिवाळी" या अण्णांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.जनसामान्यांना जीवनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त होऊन ते सुजाण व्हावेत याच हेतूने वेगवेगळ्या विषयावरचे, त्या त्या विषयात पारंगत असलेल्या लेखकाने लिहिलेले आणि तेही अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले असे एक पुस्तक दर महिन्याच्या २० तारखेला प्रकाशित होत राहिले. अगदी पहिल्या अंकापासून आक्कांनी म्हणजेच डॉ.सरोजिनी बाबर यांनीच या अंकांचे संपादिका म्हणून काम केले आणि लेखनाबरोबर एकूणच सर्व व्यवस्थापनाचे काम गुरुवर्य अण्णांनी पाहिले.
इतिहास,भूगोल,आरोग्य, विज्ञान,शिक्षणशास्त्र,समाजकारण, अर्थकारण,कथा,काव्य,शेती,कायदा, अध्यात्म,क्रीडा,कला,नाट्य,चित्र असे वेगवेगळे विषय या पुस्तकांमधून जाणकारांकडून लिहून घेऊन, दीनानाथ दलाल,पाथरकर,ग.ना.जाधव अशा अनेक उत्तम चित्रकारांकडून मुखपृष्ठ चित्रे काढून घेत, आनंद मुद्रणालयाकडून अतिशय सुबकपणे छापून घेऊन, ही पुस्तके दर महिन्याला प्रकाशित होत होती आणि हे उत्तम कार्य पुढेही वर्षानुवर्षे होत राहिले. सर्व सोप्या भाषेत पुस्तके असत. यावर पु.ल.देशपांडे यांनी एका पत्रात लिहिले आहे... "सोपे लिहिणे हे सर्वात अवघड काम आहे. तुमच्या डोळ्यापुढे तुमचा वाचक, त्याच्या बौद्धिक, सांस्कृतिक,सामाजिक पार्श्वभूमीसकट उभा आहे,त्याचे हित कशात आहे याचा पक्का अंदाज तुम्हाला आहे आणि म्हणूनच ही "समाज शिक्षण माला" वर्षानुवर्षे वाचकांशी उत्तमपणे संवाद साधू शकली.." केवळ नवशिक्षित जनसामान्यच नव्हे,तर प्रचंड अशा विद्वानांमध्येही ”समाज शिक्षण माला” प्रिय झाली. एकूण ५५० पुस्तकांमध्ये, स्वतः श्री कृ.भा.बाबर यांची एकूण ९९ पुस्तके, तसेच सरोजिनी अक्कांची एकूण ८७ पुस्तके,अक्कांच्या दोघी धाकट्या भगिनी सौ .कुमुदिनी पवार यांची १८ पुस्तके आणि शरदिनी मोहिते यांची ५१ पुस्तके, अशी एकूण २५५ पुस्तके ही या बाबर घराण्यातील लेखकांची झाली. या व्यतिरिक्त, समाजातील अनेक नामवंत विद्वान लेखकांनी उर्वरित २९५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये सर्वश्री ग.ल.ठोकळ, डॉ.सुमती क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर, नरुभाऊ लिमये, शरदचंद्र गोखले, सेतू माधवराव पगडी, गंगुताई पटवर्धन, गोपीनाथ तळवलकर, डॉ.रा.ना.दांडेकर, रमेश मंत्री, शंकर पाटील, म.म.द.वा.पोतदार, गोविंदस्वामी आफळे, बा.भ.बोरकर, दुर्गा भागवत, शंकरराव खरात, बापू वाटवे, बबनराव नावडीकर, ना.सी.फडके, मालतीबाई दांडेकर, मृणालिनी देसाई, नानासाहेब गाडगीळ, गो.नि.दांडेकर,शांता शेळके, राम शेवाळकर, जयंत नारळीकर ...अशा असंख्य लोकप्रिय व जीवनाच्या अनेक अंगातले प्रतिभावान लेखकांची नावे आहेत, ज्यांनी समाज शिक्षण मालेसाठी लेखन केलेले आहे..या साऱ्यांचा आक्कांशी जवळचा परिचय तर होताच, पण अतिशय आपुलकी देखील होती. वडील गुरुवर्य श्री कृ.भा.बाबर, म्हणजेच अण्णा असेपर्यंत मालेचे २८५ अंक निघाले. त्यानंतरही आक्कांनी नेटाने प्रकाशन चालू ठेवले..आणि ५५० पुस्तकांचा मनोरा उभा राहिला..या प्रकाशन सोहळ्याला म.म.द.वा.पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी, यांच्यासारखे विद्वान, साहित्यिक, राजकीय पुढारी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून असत. ना. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, मधुकरराव चौधरी, ना.ग.गोरे, राजाराम बापू पाटील, मोहन धारिया,bशरद पवार, नंदिनी सत्पथी असे काही पुढारी, शंतनुराव किर्लोस्कर, बी.गी.शिर्के यांच्यासारखे उद्योगपती आवर्जून येत असत. प्रौढ शिक्षणाचे समाज शिक्षण मालेने केलेले काम हे खरोखरीचे एकमेवाद्वितीय असेच आहे.
समाज शिक्षण माले व्यतिरिक्त आणखीही एक प्रकाशन अण्णा व आक्कांनी सुरु केले. मात्र त्याचे स्वरूप मासिक प्रकाशनाचे नव्हते. आकार आणि त्याच्या किंमती निरनिराळ्या होत्या. ते होते समाज शिक्षण प्रकाशन . या प्रकाशनातून डॉ.सरोजिनी बाबर यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली.
- वनिता सरस्वत (प्रबंध)
- मराठीतील स्त्रीधन
- नव्याची पुनव(कथासंग्रह)
|
- चिंचेची पत्रावळी (कथासंग्रह)
- डोंगरची मैना (कथासंग्रह)
- झालं गेलं सांगते (कथासंग्रह)
|
- राही रुक्मिणी (कथासंग्रह)
- माहेरचा चंद्र
- कुलाचार
|
- यशोधरा
- रुखवत हे कथासंग्रह
|
याशिवाय, सरोजिनी आक्कांनी निरनिराळ्या नियतकालिकांमधून सतत लेखन केले. शिवाय
इतर प्रकाशनांतर्फे पुढील ग्रंथसंपदा प्रसिद्ध झालेली आहे.
सहा कादंबऱ्या
- कमळाचं जाळं
- अजिता
- तू भेटायला नको होतास
|
- इथं गोष्ट संपली
- हिरवा चुडा
- आठवतंय तेवढं सांगते
|
|
|
कथा संग्रह आणि ललित लेख संग्रह
- काळी मखमल
- खुणेची पाने
- खिरापत
- ग्रामलक्ष्मी
- धरीत्रीच्या लेकी
- नवलाख तारांगण
- नवलाखी हार
|
- निळे डोळे
- देवदर्शन
- पाटपाणी
- भूक लाडू तहान लाडू
- भिंगरी
- भांगातुरा
- मुक्तांगणं
|
- मंगलाक्षता
- सुशोभन
- स्थित्यंतर
- गुलाबकळी
- निरशा दुधाची घागर
- स्वारी सुखात आहे
- मी माझ्या घरची
|
- चंद्राची भारजा
- महिला मंडळ
- मानवी प्रवास
- आमची गाणी
- राधाई
|
आत्मकथन
बालवांग्मय
- बालनाटिका : भाग १ ते ४
- भारतीय स्त्रीरत्ने : भाग १ ते ४
- काचेची पेन्सील
- जम्माडी जम्मत : भाग १ आणि २
|
इतर
- मराठी लोककथा
- महाराष्ट्र :- लोकसंस्कृती व साहित्य
- लोकगीतातील सगे सोयरे
- भारतीय स्त्री शिक्षण संस्था
- रेशीम गाठी
|
- मी पाहिलेले यशवंतराव
- वसंतदादा गौरव ग्रंथ
|
काव्य
|
याव्यतिरिक्त, त्यांनी सह संपादन केलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.
- एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला
आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
- इ .७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य
मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
- सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी
- साहित्यदर्शन -आधुनिक वांग्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन हे
पुस्तक डॉ.वि.म.कुलकर्णी यांच्यासह लिहिले.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी मा.यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर आक्कांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री चिं.ग.कर्वे अध्यक्ष होते.
त्यानंतर डॉ.सरोजिनी आक्कांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितीज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या
निरनिराळ्या भागातल्या लोक वाण्ग्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सन उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे..आक्का लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष असताना पुढील पुस्तके प्रसिद्ध झाली.
- महाराष्ट्र लोकसाहित्य माला:
भाग ५
- लोकसाहित्य आणि
लोकसंस्कृती - संमेलन वृतांत
- बाळराजे
- लोकसाहित्य -भाषा आणि
संस्कृती
|
- जा माझ्या माहेरा,
- एक होता राजा
- लोकसाहित्य साजशिणगार
- जनलोकांचा सामवेद
- तीर्थांचे सागर
- राजविलासी केवडा
- जाई मोगरा
- सांगीवांगी
|
- नंदादीप
- लोकसाहित्य :शब्दकोश
- कुलदैवत
- स्त्रियांचे खेळ आणि गाणी
- रांगोळी
- भोंडला भुलाबाई
- वैजयंती
- आदिवासींचे सण -उत्सव
|
- श्रावण भाद्रपद
- छंद माझा आगळा
- दशहरा दिवाळी
- कारागिरी
- नादब्रम्ह
|
आक्कांनी काम केलेली आणखी एक समिती म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळ.
ा समितीमुळे अनेक महत्वपूर्ण पुस्तकांची निर्मिती होत होती.
आणखी एक समिती म्हणजे गुरुवर्य सोनोपंत (मामा) दांडेकर प्रमुख असलेली नामदेव
गाथा संशोधन समिती..या समितीने तब्बल ११ वर्षे संत नामदेवांच्या एकेका अभंगांचा
निरनिराळ्या पोथ्यांतील पाठांचा अभ्यास करून नामदेवांच्या लेखनाची अधिकृत प्रत
प्रसिद्ध केली.
आक्कांनी काम केलेली एक वेगळीच समिती म्हणजे नाट्य परीक्षण मंडळ.-रंगमंचावर सदर
केल्या जाणाऱ्या नाटकांच्या आणि तमाशांच्या संहिता तपासून त्यात वेळप्रसंगी
दुरुस्त्या कार्वावून घेऊन संमती देणारी ही समिती होती. - सेन्सॉर बोर्ड.
आकाशवाणीवरील सहभाग आणि रानजाई मालिका
सरोजिनी आक्कांनी आकाशवाणी पुणे केंद्राच्या सल्लागार समितीवरही काम केले.
आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला. शिवाय लोकवाग्मय -लोकगीते,
लोकजीवन, लोकसंस्कृतीवर आधारित अशा १२ विषयांवर दरमहा एक अशा १२ उत्कृष्ट
कार्यक्रमांची मालिका आपल्या सहभगिनींना सोबत घेऊन सदर केली. काही कार्यक्रम
आकाशवाणी महोत्सवात (live ) प्रक्षेपणाचे वेळी सादर केले. या कार्यक्रमांना
उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून लोकसाहित्यविषयक संमेलन
भरवले.त्यात अनेक परिसंवाद घडवले. लोककलांचे प्रदर्शनही उत्कृष्टपणे उभारले.
मुंबई दूरदर्शनवरून २३ डिसेंबर १९८४ ला प्रक्षेपित झालेली "प्रतिभा आणि प्रतिमा"
यामध्ये डॉ .सरोजिनी बाबर यांची श्री सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत अतिशय
दर्जेदार अशी झाली.**
२३ जानेवारी १९९० पासून मुंबई दूरदर्शन ने सादर केलेली आक्कांची "रानजाई " हि
१३ भागांची मालिका . या मालिकेतून मराठी संकृतीचे नेटके आणि नेमके असे विलक्षण
आणि प्रत्ययकारी दर्शन घडले. यातील प्रत्येक भागाचे लेखन करून अनेक मराठी
ठिकाणांचे, गाण्यांचे, नृत्याचे, रिवाजांचे चित्रण करून कवयित्री शांताबाई
शेळके यांच्याबरोबर केलेली चर्चा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रंजक ठरली. ही मालिका
विलक्षण लोकप्रिय ठरली.
.म.म.द.वा.पोतदार, रियासतकार सरदेसाई, श्री.म.माते, डॉ.के.ना.वाटवे,डॉ.पु.ग.
सहस्त्रबुद्धे, डॉ.वा.भा.पाठक,प्र.के. अत्रे, कवी गिरीश,कवी यशवंत, आनंदीबाई
शिर्के, बा.ग.जगताप, सेतुमाधवराव पगडी, द.रा.बेंद्रे,आबासाहेब मुजुमदार,
बाबासाहेब पुरंदरे,ग.ल.ठोकळ अशा सारख्यांकडे आणि त्यांचेही नेहमी येणेजाणे
आक्कांच्या घरी असायचे. त्या
.म.म.द.वा.पोतदार, रियासतकार सरदेसाई, श्री.म.माते, डॉ.के.ना.वाटवे,डॉ.पु.ग.
सहस्त्रबुद्धे, डॉ.वा.भा.पाठक,प्र.के. अत्रे, कवी गिरीश,कवी यशवंत, आनंदीबाई
शिर्के, बा.ग.जगताप, सेतुमाधवराव पगडी, द.रा.बेंद्रे,आबासाहेब मुजुमदार,
बाबासाहेब पुरंदरे,ग.ल.ठोकळ अशा सारख्यांकडे आणि त्यांचेही नेहमी येणेजाणे
आक्कांच्या घरी असायचे. त्या सर्वांच्या सहवासात साहित्यिक चर्चा घडत,
इतिहासविषयक विवेचने होत असत. वडिलांशी देखील कितीतरी वेळा आक्कांची सांगोपांग
चर्चा होत असे. आक्कांचा लिहिता हात अत्यंत सुंदर अक्षरात कागदावर अहोरात्र
सरसर लिहित राहिला..त्यांची वक्तृत्व कला देखील उत्तम,अगदी ऐकत राहावी अशीच
होती. आक्कांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. गजाननराव वाटवे,
गोविंदराव टेंबे, वत्सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर यांचीही
चांगली ओळख होऊन त्याच्याशी भेटीगाठी होऊन आक्कांवर गायनसंस्कार होत राहिले.
त्याचमुळे अत्यंत सुरेल, गोड ठाम आवाजात आक्का उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.
संस्कृतीच्या फार मोठ्या ठेव्याचे अतिशय उत्तम प्रकारे संशोधन, संकलन करण्याचे
महान कार्य आक्कांनी केलेलं आहे.
आक्कांना मिळालेले गौरव आणि पुरस्कार
डॉ.सरोजिनी बाबर यांचा अनेकवार गौरव करण्यात आला.
- ५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठातर्फे D.Sc. पदवी देण्यात आली.
- २५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे D.Lit. पदवी प्रदान करण्यात आली.
- जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यातडॉ.सरोजिनी बाबर यांनाही आवर्जून आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
- ३० जानेवारी १९९२ ला ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
- १ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
- १२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
- २७ डिसेम्बर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे आक्कांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.
- ७ september १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
- २३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगर पालिकेतर्फे पठ्ठे बापूराव पुरस्कार दिला गेला.
- २३ डिसेंबर १९९७ ला पुणे विद्यापीठातर्फे D.Lit. ही सन्माननीय पदवी प्रदान करण्यात आली.
- पिंपरी चिंचवड नगरपालिकेनेही आक्कांचा गौरव केला.
- २६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
- १० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
अनेक पदव्या, मोठी सन्मानाची पदे मिळाली, विशाल कार्यक्षेत्रात अत्यंत धडाडीने
कार्य होत राहिले आक्कांचे. पण त्यांचा मूळ साधेपणा होता तसाच होता . त्यांना
घरातले सारेचजण,आई वडील, धाकट्या बहिणी,त्यांची कुटुंबं, भाचरं, नातवंड..सारे
जीव की प्राण होतेच. शिवाय मैत्र जपणारा गोतावळा देखील फार मोठा होता. हाताखाली
काम करणारे सर्व मदतनीस लोक आक्कांना फार मानत असत. सर्वांवर प्रेम करणाऱ्या
आक्का कोणाचे कधी चुकले की त्यांना फैलावरही घेत असत. शिस्तीने काम करणे
त्यांना पसंत होते. कर्मयोग्याचे आचरण त्यांनी अखंडपणे शेवटपर्यंत चालू ठेवले.
सामाजिक व साहित्य क्षेत्रातील योगदान
- अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य कमिटी (१९६१ तोते १९९३)
-
सदस्य - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडल
-
सदस्य - विश्वकोश कमिटी
-
सदस्य - अखिल भारतीय समाजकल्याण समिति
-
सदस्य - पुणे विद्यापीठ सिनेट कमिटी
-
अध्यक्ष - महाराष्ट्र साहित्य परिषद
-
सदस्य - पुणे मराठी ग्रंथालय
-
सदस्य - आकाशवाणी सल्लागार समिति
-
सदस्य - नामदेव गाथा समिति
|